
आंबेघर तर्फे मेढा (ता जावली ) येथील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा पूल अजूनही दिमाखदार सेवा देत होता . विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर केळघर - मेढा सातारा या मार्गावरचा हा अत्यंत महत्त्वाचा पूल . ना . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२० साली या विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गाचे विकासासाठी जवळपास चारशे कोटीचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करण्यात आला मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या पुलाचे तसेच केळघर बाजारपेठेतील एका लेनचे , बसस्टॉपची तसेच किरकोळ कामे रखडली . मात्र आता बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नव्याने या पुलासाठी आठ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे . या मार्गावरील वाहतुकीस महत्त्वपूर्ण असणारा केळघर - मेढा - सातारा या रस्त्यावरील हा पूल अनेक घटना , इतिहासाचा साक्षीदार आहे . आंबेघर तर्फ मेढा येथील रामजीबुवा मंदिराजवळ हा वेण्णा नदिवरील पूल ब्रिटीशकालीन असून आर्च पद्धतीने कोरीव दगड , चुण्याच्या मिश्रणात बांधलेल्या या पुलाला १५० वर्षे झाली असून अजूनही रहदारी चालू आहे या पुलाच्या इतिहासात पहिल्यांदा जुर्ले २०२१ च्या महापूरात या पुलावर पाच फूट पाणी होते . तरीही हा पूल दिमाखात उभा होता . असे ज्येष्ठ जाणकार सांगतात . या पुलाची कालमर्यादा संपली असली तरी अजूनही तो दिमाखात सेवा बजावत होता . शेजारीच प्रवाशांचे श्रध्दास्थान असलेल्या रामजी बुवाचे मंदिरात , शेडमध्ये अनेकजण प्रवासातून थकून - भागून विश्रांती घेत .