जावळी कन्या प्राची संकपाळ झाली पोलीस सब इन्स्पेक्टर


जावळी कन्या  प्राची संकपाळ झाली पोलीस सब इन्स्पेक्टर 
  मेढा :-   मेढा गावचे स्थायिक असलेले ,मूळचे महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आहीर गावच्या सर्जे कुळातील वै.वा.ह. भ.प.नारायराव रामचंद्र संकपाळ (सर्कल) यांची नात, स्टॅपव्हेंडर श्री-ज्ञानेश्वर संकपाळ यांची कन्या कुमारी प्राची संकपाळ हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यशसंपादन केले असून, महिला EWS प्रवर्गातून पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे. कु. प्राचीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत असून जावळी तालुक्याची मान तिने उंचावली आहे.
      प्राची संकपाळ हीचे प्राथमिक शिक्षण मेरी एंजल्स स्कुल आखाडे तसेच उच्च शिक्षण इंदिरा कॉलेज ऑफ इंजनिअरींग पुणे येथे झाले असून, आपली जिद्य व चिकाटी न सोडता आपल्या अफाट इच्छाशक्तीवर तीने सन २०१९ पासून MPSC परिक्षेचा अभ्यास केला यामध्ये सातारा येथील कृषी गंगा कलास तसेच सातारा येथील वाचनालयात दिवस रात्र अभ्यास करून सेल्फ स्टडी केला व अखेर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली.
शासनाने राज्य लोकसेवा आयोग - एमपीएससी सरळसेवा भरतीमध्ये EWS आरक्षणांचा लाभ मराठा समाजाला देण्याचे धोरण राबवले होते. याचा लाभ प्रत्येक विध्यार्थीना होण्यासाठी (ईडब्लूएस आरक्षणाबाबत) *महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब* यांनी पुढाकार घेतला व त्याबाबत उच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यामुळे उच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य केल्याने मराठा समाजासह अन्य विविध भरती प्रक्रियांमध्ये रखाडलेल्या शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला. यात अडकलेले साधारण ३००-४०० वर्ग-१ व २ चे मराठा उमेदवार तसेच १००-२०० इतर प्रवर्गातील उमेदवार यांचा नुकताच निकाल लागला असून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आर्थिक दुर्बल-ईडब्ल्युएसच्या प्रवर्गातून. कुमारी प्राची ज्ञानेश्वर संकपाळ हीने महाराष्ट्र राज्यात प्रथम रँक मिळवीला आहे.
       कुमारी प्राचीच्या निवडी बघल तीच्या कुटुंबाने अभिनंदनीय मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला आहे. तीच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब, सातारचे खासदार छत्रपती श्री.उदयनराजे भोसले साहेब, सातारा जावलीचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, मा. जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे भाऊ, ठाण्याचे मा. नगरसेवक प्रकाश शिंदे, समाजसेवक सुभाष शिंदे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, जावली बँकेचे चेअरमन विक्रमजी भिलारे , व्हा.चेअरमन चंद्रकांत दळवी, सेवा निवृत्त संघटना जावळीचे अध्यक्ष पांडुरंग संकपाळ तसेच ग्रामस्त मंडळ मेढा, ग्रामस्त मंडळ आहीर, सर्जे कुळवंत बंधु आणि इत्तर मित्र परिवार व आप्तेष्ट यांनी तीचे अभिनंदन केले आहे.
Previous Post Next Post