केळघर : महाबळेश्वर नजीक केळघर घाटात खाजगी कपंनीकडुन विनापरवाना लाखो रुपायाची रॅायल्टीला चुना लावत . खाजगी कपंनीकडुन खुलेआमा केबलकरीता खोदाई सुरु असुन या खोदाईमुळे शासकीस दिशादर्शक फलक व घाटातील सुरक्षा रक्षक उभारलेली यत्रणा तोडुन जेसीबीच्या माध्यमातुन काम सरु असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र हाताची घडी तोडांवर बोट ठेवत बघ्याची भुमीका घेत आहे . जनता धारेवर अन् ठेकेदार कडेवर अशी अवस्था केळघर घाटातील सुरु असलेल्या खोदाईवरुन लपुन राहीले नाही .
केळघर घाटातील विनापरवाना खाजगी कपंनीकडुन सुरु असलेल्या विनापरवाना केबल खोदाईमुळे रस्त्याच्या रीबव डेव्हलपमेंन्ट मधील झांडांना धोखा निर्माण झाला आहे . खाजगी ठेकेदार कपंनीला मागितलेल्या परवानगीच्या कागदपत्रात भलताच घोळ असुन खाजगी ठेकेदार कंपनीकडुन मात्र मुख्य अभियंता पुणे यांचा तारीख नसलेला कागद दाखवुन दिशाभुल केली जात असल्याच सत्य समोर आले आहे .
कार्यकारी अभियंता सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांची परवनागी घेण बंधनकारक असताना अशी कोणतीही परवानगी खाजगी ठेकेदार कपंनीकडुन उपलब्ध नसल्याची प्राथमिक माहीती खाजगी ठेकेदार कपनीच्या सुपरवायझरने चर्चा करत असताना दिली . सार्जनिक बांधकाम विभाग जावलीतर याबाबत कोणतीत माहीती उपलब्ध नसुन सुरु असलेल्या खोदाईबाबत सांगत आहे . शासकीय मालमत्तेच नुकसान करत केळघर घाटात केबलची विनापरवाना खोदाई : गुन्हा दाखल होणार का ?
राजकीय दबावापोटी अधिकारी विनापरवाना खोदाई करणा -या खाजगी ठेकेदार कपनीविरोधात करत नसल्याची चर्चा दबक्य आवाजात केळघर परीसरात सुरु आहे . तो राजकीय नेता प्रशासनात कोणाच वजन वापरुन. खाजगी कपंनीला खुलेआम खोदाई करत आहेत . शासकीय रॅायल्टीला चुना लावुन केबल खोदाईला कोणाचा वरदहस्त याची चर्चा रंगु लागल्या आहेत .
जावली तालुक्यातील वन विभाग हाताची घडी तोडांवर बोट ठेवुन वृक्षाच होणार नुकसान उघड्या डोळ्यानी का बघत आहे हा देखील संशोधनाचा विषय झाला आहे . संबधित खाजगी कपंनीवर विनापरवाना खोदाईकरुन रिबन डेव्हलपमेट प्लान व केळघर घाटातील बफर झोन मध्ये खोदाई केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागव, वन विभाग , तसेच महसुल विभागाकडुन सयुक्त कारवाई होवुन . लवकरात लवकर खोदाई बंद व्हावी अशी मागनी सर्वसामान्य नागरीकाणकडुन होत आहे