केळघर - : खटावमध्ये ४७ वर्षांची परंपरा जपत सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात जावळी तालुक्यातील श्री विठ्ठल धाम प्रतिपंढरपूर क्षेत्र आंबेघर येथील संस्थापक अध्यक्ष प्रवीण महाराज शेलार यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी हाती टाळ, डोक्यावर टोपी आणि मुखाने हरिनाम म्हणून अगदी बेभान होऊन तल्लीन होऊन नाचणारी मुले सर्वांचे आकर्षण ठरू लागली आहेत.
हरिपाठ, तसेच रात्रीचे कीर्तनाचे वेळी हातात टाळ, तबला व पखवाजाच्या तालावर धरला जाणारा ठेका व मुखाने हरिनामाचा गजर पाहता त्यांच्यावर या वारकरी शिक्षण संस्थेतून केले जाणारे संस्कार देखील प्रकर्षाने दिसून येत आहेत. युवा खटावमध्ये सुरू असलेल्या पारायण सोहळ्यात आंबेघर येथील वारकरी संप्रदायातील लहान मुले सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
पिढीला भक्ती मार्गाकडे वळवून संस्कार पिढी तयार करण्यासाठी वारकरी संप्रदाय आग्रेसिव्ह झाला आहे. यापूर्वी श्री क्षेत्र आळंदी तसेच क्षेत्र पंढरपूर याच ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या विचार व संस्कार शिकवले जायचे. तेथे जाऊन शिकणे सर्वांनाच शक्य होत नसल्यामुळे बरेच ठिकाणी काळाची गरज ओळखून लहानपणापासूनच मुलांच्या वर योग्य ते संस्कार घडवण्यासाठी आशा वारकरी शिक्षण संस्थातून या भक्तीमय अशा संस्कारांचे धडे शिकवण्याचे व रुजवण्याचे कार्य सुरू आहे, अशी माहिती प्रवीण शेलार यांनी दिली.