(मेढा ) विनोद वेंदे :- जवळवाडी भैरवनाथ मंदिर परिसर या ठिकाणी आपला संकल्प विकसित भारत यात्रा रथाचे ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अतिशय उत्साहात स्वागत केले सदर रथाचा माध्यमातून गावामध्ये केंद्र शासन व राज्य शासन यांचे कडून राबविणेत येणारे विविध विकास योजनांची माहिती चित्रफिती द्वारे प्रदर्शित केली. त्याच प्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थ यांनी सदर योजना जाणून घेतले . तसेच प्रधानमंत्री आवास योजना , दिव्यांग घरकुल योजना , रमाई आवास घरकुल , स्वच्छ भारत मिशन लाभार्थी , कृषी विभाग लाभार्थी यांनी यावेळी प्रत्येकाने योजना राबवत असतानाचे अनुभव सर्व ग्रामस्थांना सांगितले. जावळीचे कार्यसम्राट आमदार माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम आणि पंचायत राज व ग्रामविकास सातारा जिल्हाध्यक्ष गणेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सदर आपला संकल्प विकसित भारत यात्रा चे स्वागत सरपंच सुरेखा मर्ढेकर सर्व ग्रा.प. सदस्य , यांनी केले. यावेळी ग्रामसेवक निर्मला भुजबळ , एकनाथ लोहार पोलीस पाटील, शंकर सावंत तलाठी, विलास कदम कृषी सहाय्यक अधिकारी, अनिता जाधव शिक्षिका, विद्या जवळ आशा सेविका, अंगणवाडी सेविका उज्वला जवळ मिराबाई जवळ आणि संतोषी देशमुख, डॉ एल एम माने पशुधन् विकास अधिकारी मेढा , त्याचं प्रमाणे गांवातील सर्व ग्रामस्थ ,महिला व कर्मचारी सदर कार्यक्रमांस उपस्थित होते. यावेळी भारत सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सतीश मर्ढेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी गीता लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि भारत सरकारच्या विविध योजनांची थोडक्यात माहिती दिली. जवळवाडी ग्रामपंचायत च्या सौ सुरेखा मर्ढेकर सरपंच जवळवाडी ,शंकर जवळ उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य जवळवाडी गीता लोखंडे, शांता जवळ, राजेंद्र निकम,कल्पना जवळ या सर्वांनी ग्रामस्थांना प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ ,विद्यार्थी व महिला यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित नवसरे, तालुका उपाध्यक्ष भानुदास ओंबळे, मेढा शहर प्रमुख विनोद वेंदे, मेढा उपाध्यक्ष अथर्व गाडगीळ, उपस्थित होते.श्री सतीश मर्ढेकर यांनी केले सर्वांचे आभार व्यक्त केले.