कुरोळशी येथील श्री कोंडीराम श्रीपती वाडकर यांचा वाढ दिवस उत्साहात साजरा

जगभरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात असून त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे वैभव संकटात सापडले असून पर्यावरणाचा बिघडलेला समतोल वेळीच सावरणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे. याची जान ठेवून जावली तालुक्यातील कुरोळशी गावचे जेष्ठ नागरिक श्री कोंडीराम श्रीपती वाडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांचे चिरंजीव युवा उद्योजक सुरेश कोंडीराम वाडकर यांनी कुरोळशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या पन्नास वृक्षांचे  वृक्षारोपण करून आपल्या वाडिलांचा वाढदिवस साजरा केला.
              वृक्ष आपल्याला फक्त सावलीच देत नाहीत तर वृक्षांपासून अनेक फायदे आहेत. पर्यावरणाची भयंकर समस्या संपूर्ण जगासमोर उभी आहे. मानवाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असलेले वृक्ष आपले जीवनदाते असून सर्वांनी उद्योजक सुरेश वाडकर यांच्या सारखा वाढ दिवस साजरा केला पाहिजे  वृक्ष लागवड करून कधी ढगफुटी तर कधी दुष्काळ अशा समस्या नष्ट होऊ शकतील.                               
         कुरोळशीमध्ये  वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला  त्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी  अभिनंदन करून सर्व वृक्षांचे योग्य संगोपन करण्याचे आवाहन केले आहे.
            वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड  काबाडकष्ट करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण तर दिलेच परंतु त्यांच्यावर चांगले संस्कारही केले. त्या वडिलांच्या ऋणातून किंचित उतराई व्हावे यासाठी  वडिलांच्या ७० वा वाढदिवसा  निमित्त वृक्षारोपण, व शालेय मुलांना साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. या वेळी
कुरोळशी येथील कोंडीराम वाडकर   यांच्या 70 व्या  वाढदिवसानिमित्त मंगळवार दि 15 ऑगस्ट 2023 रोजी  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी  बहुसंख्य नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थ  उपस्थित होते.
   सुरेश वाडकर व नातेवाईक ग्रामस्थ मित्र मंडळी यांनी एकत्र  येऊन आपल्या कोंडीराम वाड कर यांचा कृतज्ञता सोहळा व शुभेच्छा सोहळा अतिशय थाटामाटात व आनंदात साजरा केला. या कार्यक्रमासाठी कुरोळ शी चे सरपंच रमेश वाडकर , धनावडे सर , शेलार सर, निलेश तोडकर , सागर शिर्के, राजेंद्र गुरव, सुरेश जंगम, अभिजीत तोडकर , विजय गुरव , ग्रामस्थ मंडळ कुरोळशी उपस्थित होते .   

       यावेळी सर्वांनी कोंडीराम वाडकर यांना  दीर्घायुष्य लाभावे व पुढील  आयुष्य सुखा समृधी चे जावे अशा शुभेच्छा दिल्या. आई-वडिलांसाठी मुलांनी कसे वागावे याचे उदाहरण उद्योजक सुरेश वाडकर यांनी केलेला उपक्रम परिसरातील एक चर्चेचा विषय बनला.  संपूर्ण कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात साजरा केला.   वडिलांच्या हस्ते  मोठ्या प्रमाणात अन्नदानही करण्यात आले.
Previous Post Next Post