अध्यात्मिक क्षेत्रातील सामाजिक कार्य व भक्तीभावपूर्ण सेवेचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारा अध्यात्मिक सेवागौरव पुरस्कार मुक्ताताई प्रवीणमहाराज शेलार यांना प्रदान करण्यात आला.
श्री क्षेत्र आळंदी या ठिकानी विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.निलमताई गोरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करन्यात आला.या कार्यक्रमसाठी वारकरी संप्रदायाचे जेष्ठ व पुजनीय आसनारे शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर उपस्तिथ होते.
सौ मुक्ताताई शेलार यांनी गेल्या १७ वर्षापासून श्रीविठ्ठलधाम प्रतीपंढरपुर क्षेत्र आंबेघर येथे शेकडो वारकरी बालकांचे संगोपन करुण त्या मुलांना आईचे प्रेम दिले.आषाढ़ी वारी दिंडी क्रमांक-९९ मद्धे शेकडो भाविकांची प्रतीवर्षी त्या सेवा करत आहेत.ज्ञानेश्वरी व गाथा त्यानी हस्तलिखित केला आहे.अशा अनेक वारकरी सेवाकार्याची दखल घेत त्यांना धर्मवीर आध्यात्मिक सेना व श्रीमंत माऊली प्रतिष्ठानचा हा मानाचा पुरस्कार प्रदान करन्यात आला.मुक्ताताईंच्या पुरस्काराने वारकरी संप्रदायातील प्रामाणिक सेवेचा सन्मान झाल्याचे दिसून येते.