केळघर ता जावली येथे कुसूंबी गटातील जनतेचा आयोजित मेळावा संपन्न

केळघर :
जावली तालुक्यातील गावा - गावात, वाडी वस्तीवर विकासाचा रथ पोहचला आहे . जावलीला वैभवशाली इतिहास असून छत्रपती आणि मावळे यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले आहे . आपले रक्ताचे नाते आहे . कोणीही कितीही भूमिपूत्र म्हणून भूलथापा मारल्या तरी येथील जनता त्याला आता बळी पडणार नाही . शेतकरी, महिलांच्या उन्नतीसाठी भाजपा , महायुती विविध कल्याणकारी योजना राबवत आहे . त्यामुळे जावलीकर भाजपा महायुतीच्या सोबत पूर्ण ताकदीनिशी उभे राहून पुन्हा एकदा इतिहास घडवतील असा विश्वास भाजपा महायुतीचे उमेदवार आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला .
     केळघर ता जावली येथे कुसूंबी गटातील जनतेच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते .यावेळी जि प चे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्क एकनाथ ओंबळे , प्रशांत तरडे, मोहनराव कासुर्डे , माजी जि प सदस्या सौ अर्चना रांजणे , जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे , बाजार समिती चेअरमन जयदीप शिंदे , भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे,केळघर विकास सोसायटी चेअरमन सुनिल जांभळे, एकनाथ रोकडे, पांडुरंग जवळ, दत्ता आण्णा पवार,विकास देशपांडे, आदिनाथ ओंबळे, मच्छिंद्र क्षीरसागर , जगन्नाथ वाडकर,गीता लोखंडे , निर्मला दुधाणे,निर्मला कासुर्डे ,कविता धनावडे, जयश्री शेलार, बबनराव बेलोशे, प्रमोद पार्टे,सचिनशेठ पार्टे , तुकाराम धनावडे,सागर धनावडे सुनिल देशमुख , सचिन सावले , रामभाऊ शेलार, संतोष कासुर्डे , विकास ओंबळे , चेतन धनावडे, अंकुश बेलोशे ,सचिन बिरामणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती .
     यावेळी आ भोसले पुढे म्हणाले, भाजपा महायुतीने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे महिलावर्गाने आता निवडणुक हातात घेतली असून त्या आता विक्रमी मताधिक्यासाठी सज्ज आहेत . काही लोक नियोजित बोंडारवाडी धरणाबाबत अफवा पसरवत आहेत . परंतु या परिसरातील ५४ गावांतील कृती समितीला घेऊन , डॉ भारत पाटणकर यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेत पाठपुरावा करत या धरणासाठी , कण्हेर धरणातील एक टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवला असून आता कै विजयराव मोकाशी यांची स्वप्नपूर्ती तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार असून या बोंडारवाडी धरणाला विजय सागर असे नाव देण्यात येईल असे सांगितले . काही गावातील ७/१२ चा विषय आहे तो जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेती कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे . मतदार संघ पुर्नरचनेत मी कुठेही जाणार नसून कायम तुमच्या सोबत आहे तुम्ही पूर्ण ताकदीनिशी भाजपा महायुती सोबत रहा . असे आवाहन यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले .
       यावेळी ज्ञानदेव रांजणे म्हणाले , कुसूंबी गटातून आ भोसले यांना १५ ते २ ० हजाराचे मताधिक्य देऊन विरोधकांचे डिपॉझिटही जप्त करायला लावू यासाठी कार्यकर्यांनी दिवस - राञ परिश्रम घेत आहेत . येथील जनतेची विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती हे बाबाराजेंवरील प्रेमाचे प्रतिक आहे . कोणीही काहीही म्हणाले तरी शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विक्रमी मताधिक्याने निवडून येणार आहेत . यावेळी एकनाथ ओंबळे म्हणाले , गावा गावातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून युवक , महिला , आबालवृद्ध, मुंबईकर मंडळी त्यांच्या प्रचारात सामील होत आहेत . ही त्यांनी केलेल्या विकास कामांची पोहचपावती आहे . येत्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री होण्यासाठी जननेने मताधिक्य जास्तीत जास्त वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे .यावेळी एकनाथ रोकडे, श्रीहरी गोळे , दत्ता आण्णा पवार,आदिनाथ ओंबळे, गीता लोखंडे , निर्मला दुधाणे आदींची भाषणे झाली .
     यावेळी सचिन सावले व अभय शेलार यांनी राष्ट्रवादीतून तर डांगरेघरचे शिवसेनेचे प्रथम शाखा प्रमुख चंद्रकांत सुर्वे यांनी भाजपा मध्ये तर राजेंद्र शेलार यांनी शिवसेना उबाठा गटातून शिवसेना एकनाथ शिंदे गटात यावेळी प्रवेश केला .मेढा ते केळघर दरम्यान सचिन सावले, चेतन धनावडे यांच्या नेतृत्वा खाली बाईक रॅली काढण्यात आली .
      प्रास्ताविक रामभाऊ शेलार व सागर धनावडे यांनी केले . तर आभार विजय सपकाळ यांनी मानले . यावेळी कुसूंबी गटातील गाव , वाड्या वस्त्यांवरील सरपंच, उपसरपंच , विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Previous Post Next Post