केळघर : जावली तालुक्यातील आंबेडकर नगर वाटंबे गावाच्या हद्दीत 180 लोकवस्ती असलेल्या ठिकाणी सोमवारी पाहाटे अचानक बिबट्या घुसला आणि प्रवीण कांबळे यांच्या घरातील झोपलेल्या कुत्र्याला फरफटत घेऊन गेला. याअगोदर ही याच गावात काही वेळा याच ठिकाणाहुन शेळयांना व कुत्र्यांना बिबटयाने मारून ते अर्धवट खाऊन टाकले होते.
वाटंबे गावातील प्रवीण कांबळे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर शेजारी असलेल्या कुत्र्यावर एका बिबट्याने हल्ला चढवला होता. कुत्रा बिबट्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. मीही स्वतः कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या माझ्या अंगावर येत असल्याचे माझ्या लक्षात असल्याने भीतीने मी माघार घेतली.
नंतर तो कुत्र्याला माझ्यासमोर फरफटत घेऊन गेला. अशीच घटना
गेल्या वर्षी ही याच गावात काही शेतकऱ्यांच्या शेळ्या मारून अर्धवट खाऊन टाकून गेला होता. या घटनेनंतर बिबट्यानेच या शेळ्यांचा फडशा उडवल्याचे सिद्ध ही झाले होते. या घटनेची माहिती गावा मध्ये पसरल्यानंतर गावात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या गावात रात्रीच्या वेळी कोणीही नागरिक बिबट्याच्या भीतीने बाहेर पडत नाही.
जावली तालुक्यातील वाटंबे गावची 475 लोकसंख्या असून सर्व वाड्या एका शेजारी मिळून आहेत. ज्या लोक वस्तीत बिबट्या शिरला त्या ठिकाणी 180 घरांची वस्ती आहे. रात्री अपरात्री या ठिकाणी लोकांचा सतत वावर असून.
अशा प्रकारे बिबट्या लोकवस्तीत घुसणे नागरिकांना धोका दायक आहे. या घटनेनंतर या गावात आता पर्यंत शेळ्या, गाई व कुत्री यांच्यावर हल्ला केला आहे . मात्र बिबट्याचा पुढचा हल्ला कोणावर असेल सांगता येत नाही. वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. परंतु वन विभाग काय खबरदारी घेते याकडे सर्व वाटंबेकरांचे लक्ष लागले असून वन विभागाने वेळेत लक्ष न दिल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जावली विधानसभा अध्यक्ष श्री प्रवीण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ रोकडे तालुका अध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले