केळघर : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ केळघर विभागातील कुरुळोशी व गाढवली ग्रामस्थांसमवेत कुरळोशी येथे प्रचारार्थ बैठक पार पडली.
सातारा- जावली मतदारसंघातील प्रत्येक गावां सोबत कुरुळोशी व गाढवली या गावांचाही कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे.विविध विकास कामाच्या माध्यमातून येथे कामे करण्यात आली आहेत आपण सर्व ग्रामस्थ व महिला विकासाच्याच पाठीशी उभी राहणार आहात त्यामुळे माझा विजय हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सर्वांनी कमळाला मतदान करून मला विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा बँक संचालक ज्ञानेदव रांजणे,सागर धनावडे,बबन बेलोसे सुनील नाना जांभळे, रमेश वाडकर, जगन्नाथ वाडकर, प्रकाश शिंदे,मानाजी माने रमेश शेलार,महादेव सपकाळ,नितीन शिंदे,सागर शिंदे,प्रशांत पाटील प्रशांत पाटील,विशाल जंगम निलेश तोडकर विलास चव्हाण ग्रामस्थ महिला तरुण व जेष्ठ तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे यांना महाराष्ट्रात एक नंबरच्या मताधिक्याने विजयी करण्याच्या दृष्टीने सवर्तोपरी प्रयत्न करणार असून ग्रामस्थ,महिला तरुणमंडळ व ज्येष्ठ नागरिक यांचे शंभर टक्के मतदान करून आपणास विजयी करण्यासाठी मोलाचा वाटा आमचा असेल असे युवा उद्योजक सुरेश वाडकर यांनी सर्व ग्रामस्थांसमवेत शिवेंद्रसिंहराजेंना शब्द दिला.