श्री विठ्ठलधाम क्षेत्र आंबेघरचा अयोध्या येथे १००० भाविकांसह भव्य पारायण सोहळा


केळघर : 
सातारा ज़िल्यातील एक हजार भाविकभक्त श्रीविठ्ठलधाम सोबत श्रीराम जन्मभूमि अयोध्या येथे दि.०१ जून २०२४ ते०७ जून २०२४ या कालावधी मध्ये गेले होते.त्या ठिकानी भव्य कीर्तन महोत्सवाचे व संगीत रामायण कथेचे आयोजन श्रीविठ्ठलधाम यांच्या वतीने  करण्यात आले. 
    या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार उपस्तित होते.संगीत रामायणकथा हभप माधवजी महाराज रसाळ त्याच प्रमाणे हभप मारुती महाराज पवार,हभप कोंडेकर शास्त्री,हभप बजरंग आप्पा निकम श्रीगुरु प्रमोद महाराज जगताप जांची श्रवणीय कीर्तन झाली.श्री विठ्ठलधामचे प्रमुख हभप प्रवीण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारंभाची सांगता करण्यात आली
विशेष म्हणजे आयोध्या येथे १००० भाविकासाठी श्री विठ्ठल धाम आंबेघर यांच्या वतीने पुरण पोळीचा महाप्रसाद बनवण्यात आला होता.
तसेच मोठ्या भक्तिमय वातावरनात आयोध्या मध्ये भव्य वारकरी दींडी काढण्यात आली.या भव्य वारकरी दिंडीने अयोध्यावासीयाना सातारकरांनी मंत्रमुग्द करुण सोडले.
    शरयु नदीच्या तीरावर हरीपाठ व शरयु मातेची आरती करुन सातारवासीयानी श्री रामजन्मभूमी हरीनामाच्या गजराने दुमदुमुन सोडली.
Previous Post Next Post