स्नेहमेळाव्यातून मैत्री जपण्याचा संदेश

केळघर : शेरेवाडी न्यू इंग्लिश स्कूल शेरेवाडी (चंद्रकांत बाबुराव जाधव) विद्यालयाच्या सन-१९७८ ते १९८१ बॅच चा माजी विद्यार्थी स्नेह‌ मेळावा तब्बल ४३ वर्षा नंतरच्या पुर्व भेटीने साजरा करण्यात आला त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
  शाळेतल्या जुन्या आठवणी सर्वासाठी अविस्मरणीच असतात्. एका दिवसाच्या मेळाव्यात दोस्तीच्या दुनियेत सर्वजन हरवून गेले. शाळा प्रवेश स्वागत ,गप्पागोष्टी , शाळेतील गरीब व होत‌करू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री घाटगे सर होते. प्रमुख पाहुणे श्री शिर्के सर होते. त्यावेळचे मुख्याध्यापक श्री साळुंखे सर आमचे वर्ग शिक्षक श्री कणसे सर तसेच इंग्रजी विषयचे श्री काबंळे सर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री देशपांडे सर  होते. तर सूत्रसंचालन विद्या शेलार, (नायकवडी) यांनी केले तर प्रास्ताविक श्री अशोक पवार यांनी केले . मनोगत श्री अरुण गायकवाड श्री बजीरंग साळुंखे, श्री अकुंश कदम, श्री श्रीरंग जाधव यांनी केले. आभार श्री आत्माराम लोहार यांनी मानले यावेळी  स्नेहभोजनाने मेळाव्याची सांगता झाली.
Previous Post Next Post