ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शाखा जावली ( मेढा )च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष , सचिव यांची सर्वानुमते निवड

केळघर : 
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शाखा जावली ( मेढा )च्या अध्यक्षपदी शिरिष मर्ढेकर, उपाध्यक्षपदी उषा उंबरकर यांची तर सचिवपदी सचिन बैलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
    मेढा येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्या सौ सुनिता राजेघाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या . यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आर के जाधव, प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती .
       यावेळी कोषाध्यक्षपदी कांताराम सुर्वे , संघटकपदी संजय दळवी , सहसंघटकपदी विजय खरात यांच्या निवडी करण्यात आल्या . यावेळी सौ सुनिता राजेघाटगे म्हणाल्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही सर्व सामान्यांच्या शोषण मुक्तीचे कार्य करणारी राज्यस्तरीय नोंदणीकृत स्वयंप्रेरित सेवाभावी संघटना आहे . या संघटनेच्या सर्व सभासदांनी सेवावृतीने काम करत ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत . यावेळी आर के जाधव म्हणाले , अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंद ग्राहक आहे . ग्राहकांचे हित जोपासत त्यांना होणाऱ्या फसवणुकीपासून दूर ठेवण्यासाठी तालुका ग्राहक संरक्षण परिषदेची रचना करण्यात आली आहे . यासाठी तालुका ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी जागृक राहून पारदर्शी काम करावे .
       प्रारंभी प्रमोद घाटगे यांनी स्वागत करुन ग्राहक पंचायतीचे महत्व विशद केले तर सचिन बैलकर यांनी आभार मानले .
फोटो - मेढा - शिरिष मर्ढेकर, उषा उंबरकर यांचा सत्कार करताना सौ सुनिता राजेघाटगे , आर के जाधव , प्रमोद घाटगे , संजय दळवी , सचिन बैलकर ,कांताराम सुर्वे आदि .
Previous Post Next Post