विठ्ठलधामच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन


केळघर :  श्री विठ्ठलधाम (प्रतिपंढरपूर) क्षेत्र आंबेघर (ता. जावळी) यांच्या वतीने श्रीराम जन्मभूमी क्षेत्र अयोध्या येथे भव्य संगीत रामायण कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन ३० मे ते ४ जून या कालावधीत करण्यात आले आहे, अशी माहिती विठ्ठल परिवाराचे प्रमुख हभप प्रवीण महाराज शेलार यांनी दिली.
          या महोत्सवात महाराष्ट्रातील एक हजार भाविक सहभागी होणार आहेत. कीर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार आहे, तसेच रामायण कथा सायंकाळी चार ते सात या वेळेत होणार आहे. या सोहळ्यात महंत धनंजय गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली माधव महाराज रसाळ हे रामायण कथा सांगणार आहेत, तर मारुती महाराज निगडीकर, सुप्रियाताई खंडागळे, रामचंद्र कोंडेकर, बजरंग अप्पा काळोशीकर, प्रमोद महाराज जगताप, प्रवीण महाराज शेलार यांची कीर्तन होणार आहेत. या कीर्तन महोत्सव व संगीत रामायण कथा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल वारकरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post