श्रीआदिनाथ ओंबळे यांची अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड


रघुनाथ पार्टे :- श्रमिक जनता विकास संस्था मेढा चे संस्थापक श्रीआदिनाथ ओंबळे यांची अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र पुणे ( अफार्म ) या राज्यपातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाचा फायदा सर्व महाराष्ट्र भर होणार आहे असे प्रतिपादन अफार्म चे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी केले .                     
        दि .२९ नोहेंबर रोजी पुणे येथे अफार्म च्या ५१ व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष श्री प्रमोद देशमुख यांनी श्री आदिनाथ ओंबळे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली त्यावेळी ते बोलत होते . देशमुख पुढे म्हणाले आदिनाथ ओंबळे यांनी कठिण परिस्थीत शिक्षण पुर्ण करून नोकरी न करता समाजातील अपेक्षित, मागास आदिवासी , कातकरी समाजासाठी १९९५पासून सातारा , ठाणे , रायगड , पुणे या जिल्ह्यात अनेक सामाजिक कामे करून या उपेक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्याचे मोलाचेकार्य केले आहे . तसेच कै . विजयराव मोकाशी यांचे सोबत बोंडारवाडी कृती समितीच्या माध्यमातून ५४ गावांच्या शेतीव पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही मोलाचे कार्य केले आहे त्यांच्या या प्रदिर्घ अनुभवाचा फायदा उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हयाना होणार आहे . यावेळी राज्यातील १००हून अधिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते . श्री आदिनाथ ओंबळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे . 

अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र पुणे ( अफार्म ) या संस्थेच्या कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळणे मी माझे भाग्य समजतो . या संधीचे सोने करुन महाराष्ट्रासह आपल्या जिल्हयातील ही उपेक्षित समाजघटक व संस्थांना फायदा करून देईन -श्री आदिनाथ ओंबळे  पुणे येथे "अफार्म " च्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करताना श्री प्रमोद देशमुख सोबत नवनियुक्त सदस्य . श्रीमती गिरीजा गोडबोले , श्री शहाजी गडहिर व श्री आदिनाथ ओंबळे यांचा सत्कार करताना श्री प्रमोद देशमुख .
Previous Post Next Post