केळघर : श्री कालभैरवनाथ
जयंतीनिमित्त डांगरेघर येथे उद्या (सोमवार) व मंगळवारी (ता. पाच) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या रात्री नऊ वाजता प्रवीण महाराज शेलार यांचे कीर्तन होईल. रात्री अकरा वाजता श्री कालभैरवनाथाचा जन्मकाळ व अभिषेक होईल. मंगळवारी सकाळी नऊ वाजता महिला भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी अकरा वाजता श्री कालभैरवनाथाची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता महाआरती व मान्यवरांचा सत्कार व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यावेळी खासदार श्रीनवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, जावळी बँकेचे संचालक अरुण सुर्वे, नारायण बागडे आदींसह मान्यवर उपस्थित राहतील. नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ, डांगरेघर यांनी केले आहे.