जावली येथील तहसिल कार्यालयात संविधान दिनानिमित् कार्यक्रम आयोजित


केळघर :   
भारतीय लोकशाही ही जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे . यामध्ये भारतीय संविधानाच्या मुल्यांची जोपासणी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहजग राहिले पाहिजे असे आवाहन जावलीचे प्रांत अधिकारी दादासाहेब दराडे यांनी केले .
      मेढा (ता. जावली ) येथील तहसिल कार्यालयात  संविधान दिनानिमित् आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी नायब तहसीलदार सुनिल मुनाळे , भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष वैशाली सावंत ,ज्ञानेश्वर बेलोशे , किशोर रेळेकर उपस्थित होते .
      यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली . यावेळी महसूल कर्मचारी उपस्थित होते .

Previous Post Next Post