जावली तालुक्यातील क्रिडा संकुलनाचा प्रश्न मुख्यमंञ्यांनी मार्गी लावावा .

जावली तालुक्यातील क्रिडा संकुलनाचा प्रश्न मुख्यमंञ्यांनी मार्गी लावावा . - वेण्णा दक्षिण विभाग शेतकरी मंडळाचे निवेदन
केळघर : -  जावली तालुक्याच्या अस्मितेचा असलेला क्रीडासंकुलाचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावावा याबाबतचे निवेदन  वेण्णा दक्षिण विभाग शेतकरी मंडळाच्यावतीने देण्यात आले .
       मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना दरे येथे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते . या निवेदनात म्हटले आहे .जावली तालुक्यात क्रीडासंकुल नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय क्रिडा स्पर्धा घेताना मोठा प्रश्न निर्माण होत आहे. नुकत्याच या क्रिडा स्पर्धा घेण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना घेऊन सातारचे क्रिडा संकुलन गाठावे लागले .  छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या जावली तालुक्यात आजवर विविध क्षेत्रात अनेक ऐतिहासिक पराक्रम घडले आहेत. शूरवीरांचा या तालुक्यात  शिक्षण, अध्यात्म, सामाजिक तसेच क्रीड़ा क्षेञातील  योगदान अतुलनीय आहेच. मात्र क्रीडा क्षेत्रात जावलीची कामगिरी अजूनही तितकीशी चमकदारपणे पाहायला मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे जावली तालुक्यात क्रीडा प्रशिक्षण घेण्यासाठी तालुक्यात क्रिडा संकुलन नाही .क्रीडाप्रेमींना कोणतीच सुविधा उपलब्ध नाही.  गतवर्षी तालुक्यातील शालेय धावणे स्पर्धा क्रिडांगणा अभावी चक्क राज्यमार्गावर घ्याव्या लागल्या . तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह अनेक क्रीडापट्टू आपल्या जिद्दीवर खेळतात मात्र त्यांची मर्यादा हि जिल्हापातळीपर्यंतच मर्यादित राहते. क्रीडापट्टूना जर जावलीतीच प्रशिक्षण मिळाले आणि त्याना त्यांच्या खेळाच्या सरावासाठी सुसज्ज क्रीडासंकुल मिळाले तर हीच मुले जावली तालुक्याचे नाव निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेतील  त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने विचार करून आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा जावलीचे नाव समृद्ध करण्यासाठी जावली तालुक्यात क्रीडा संकुलाचा प्रश्न मुख्यमंञी यांनी आपल्या माध्यमातून लवकरात लवकर मार्गी लागावा.
       क्रीडासंकुलासाठी मेढा दक्षिण विभागात काळोशी. ता जावली येथे प्रशस्त जागा उपलब्ध आहे. त्यामुळे क्रीडासंकुलासाठीचा जागेचा प्रश्न सुद्धा आधीच सुटलेला आहे. मेढा दक्षिण विभाग यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे. मात्र प्रशासनाच्या लाल फितीत हे प्रकरण अजूनही अडकलेलेच आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून या क्रिडासंकुलाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी या निवेदनाद्‌वारे वेण्णा दक्षिण विभाग शेतकरी मंडळाच्यावतीने करण्यात आल्याची माहिती विठ्ठल पवार यांनी दिली . यावेळी अंकुश बाबा कदम , विठ्ठल पवार , विलास दुंदळे , संपत रवले , विश्वनाथ डिगे , बाळू शेटे आदि उपस्थित होते .
Previous Post Next Post