मराठा आरक्षणाला होत असलेल्या विलंबाचा निषेध म्हणून संपुर्ण केळघर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे .

   रघुनाथ पार्टे : -  संपुर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे . राजधानी मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या सातारा जिल्हा बंदच्या आवाहनानुसार आज केळघर येथे " एक मराठा लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या          बापाच , जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देत  रॅली काढण्यात आली . तसेच मराठा आरक्षणाला होत असलेल्या विलंबाचा निषेध म्हणून संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे .                                                      महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना  .एकनाथ शिंदे यांच्या जिल्हयातच १८८१ झालेल्या जातनिहाय जनगणनेनुसार प्रसिद्ध गॅझेटमध्ये   सुमारे ५ लाख८३ हजार कुणबी  समाज   असल्याची नोंद असताना संपुर्ण महाराष्ट्रात फक्त ११ हजार कुणबी असल्याचा जावईशोध शासन नियुक्त समितीने  शासनाला सादर अहवालात केल्याने सातारा जिल्ह्यातील सकल मराठा समाज नाराज झाला असून याचे पडसाद गावोगावी उमटत आहेत . केळघर- मेढा परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी मनोज जरांगे यांना पाठिंबा व विलंब करणाऱ्या शासनाचा निषेध करणारे ठराव मंजूर केले आहेत .केळघर येथील रेली मध्ये गावातील आबालवृध्द व शालेय मुला- मुलींनीही सक्रीय भाग घेत आरक्षणाला पाठिंबा दिला . दरम्यान शनिवारी मेढा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात  केळघर ग्रामस्थ सहभागी होणार आहेत .                                   फोटो १ ) केळघर येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी रॅलीत सहभागी आबालवृद्ध व शालेय मुले - मुली .   २ ) मराठा आरक्षणास विलंब करणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी संपुर्ण केळघर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे .
Previous Post Next Post