सातारा तालुक्यातील केळवली ते दत्तवाडी रस्ता करणे ५० लाख, सोनवडी येथे सभामंडप बांधणे २५ लाख, लिंब आवळीमाथा ते दुलाचे टेक रस्ता खडीकरण, डांबरीकरण २० लाख, शिंदेघर अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण १५ लाख, लूमनेखोल जानाई मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण २० लाख, सावली अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण१० लाख, पाटेघर अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण१५ लाख, वेणेखोल अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, तांबी येथील वाघजाई मंदिर परिसरात काँक्रीटीकरण, पेव्हर बसविणे १० लाख, नित्रळ अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण २० लाख, खडगाव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, कूस खुर्द भैरवनाथ मंदिराशेजारी संरक्षक भिंत बांधणे १० लाख, यादववाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, बोरणे अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण १० लाख, आलवडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, करंजे तर्फ परळी अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण२५ लाख, वावदरे गावठाण अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, दरे तर्फ परळी अंतर्गत रस्ते डांबरीकरण १५ लाख, कोंडवली श्री दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे १० लाख, ठोंबरेवाडी ते हनुमाननगर रस्ता करणे १० लाख, नागेवाडी काळकाई देवी रस्ता खडीकरण, डांबरीकरणउर्वरित काम करणे १० लाख, हनुमाननगर ते इंगळेवाडी पोहोच रस्ता ५० लाख, रा.मा. १४० ते बेबलेवाडी ठोंबरेवाडी पोहोच रस्ता ४० लाख, शेंद्रे ए.बी.आय. टी. कॉलेज ते कातकरी वस्तीकडे जाणारा रस्ता ५० लाख, आगुंडेवाडी पोहोच रस्ता करणे ३५ लाख, जोतिबाची वाडी येथे जोतिबा मंदिरासमोर काँक्रीटीकरण ५ लाख, जोतिबाची वाडी येथे सभामंडप १५ लाख, कामथी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, सारखळ येथे चंद्रकांत बडदरे घर ते ग्रा.प. कार्यालय रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, चोरगेवाडी येथे मछिंद्र चोरगे घराकडे जाणारा रस्ता ५ लाख, आगुंडेवाडी ग्रा.प. कार्यालय ते जयवंत जाधव घर रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
जावली तालुक्यातील पिंपळी येथे वाघजाई मंदिर शेजारी संरक्षक भिंत बांधणे १० लाख, कुडाळ येथील मुस्लिम समाज दफनभूमीस संरक्षक भिंत व सुशोभीकरण १५ लाख, पानस पुनर्वसन येथे रस्ता डांबरीकरण १० लाख, सनपाने येथील दुर्गावळे वस्ती रस्ता १० लाख, घोटेघर येथील सुलेवाडी रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, हातगेघर ते भालेघर रस्ता १५ लाख, सरताळे येथे ग्रामपंचायत ते म्हसवे पाटी रस्ता खडीकरण, डांबरीकरण १० लाख, हातगेघर मुरा पोहोच रस्ता २० लाख, तळेमाळ अंतर्गत रस्ता डांबरीकरण १० लाख, महिगाव येथे मुन्ना मुसळे घर ते नामदेव पवार घर रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, वालुथ जरेवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण २० लाख, मोरावळे येथे विवरमुरा येथे सभामंडप १० लाख, कोळघर रस्ता सुधारणा करणे १० लाख, केळघर तर्फ सोळशी रस्ता खडीकरण, डांबरीकरण १० लाख, खिलारमुरा जाणारा रस्ता मजबुतीकरण १५ लाख, दिवदेव अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण १५ लाख, वाळंजवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण १० लाख, कुसूंबी येथे अंतर्गत काँक्रीटीकरण ३० लाख, तांबी येथील अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ५० लाख, कुसूंबी मुख्य प्रवेशद्वार ते बाबा चौक दरम्यान रस्ता रुंदीकरण ८५ लाख, कुसूंबी गणेश मंदिर, जांभूळवाडी ते विठ्ठल कुडवे घरापर्यंत खडीकरण, डांबरीकरण १५ लाख, कुसूंबी येथील बामणवाडी ते स्मशानभूमी मेसाचीवाडी येथे खडीकरण, डांबरीकरण करणे यासाठी ३० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे त्वरित सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.