खास दिवाळी हंगामानिमित्त महाबळेश्वर आगारा च्या वतीने महाबळेश्वर दर्शन व प्रतापगड दर्शन गाड्या सुरू


केळघर -:
खास दिवाळी हंगामानिमित्त महाबळेश्वर आगारा च्या वतीने महाबळेश्वर दर्शन व प्रतापगड दर्शन गाड्या सुरू झाल्या असून प्रवाशांचा या दर्शन गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवाशांच्या उपब्धतेनुसार दर्शन साठी ज्यादा गाड्या सोडण्यात येत असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी केले आहे. पर्यटकांसाठी आकर्षण अशी विस्टोडोम गाडी दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली असून या बसवर आकर्षक पणे महाबळेश्वर व प्रतागड येथील आकर्षक पॉइंटची चित्रे साकारली आहेत. महाबळेश्वर दर्शन गाडी दुपारी अडीच वाजता महाबळेश्वर बस स्थानकातून सुटते.यासाठी तिकीट दर एकशे दहा रुपये आहे. प्रतापगड दर्शन गाडी सकाळी साडे नऊ वाजता सुटते. दर्शन गाडीसाठी आरक्षण सुविधा देखील उपलब्ध आहे.या गाडी साठी एकशे वीस रुपये तिकीट दर आहे.या  दर्शन गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवासी संख्या वाढल्यास ज्यादा गाड्याही दर्शनासाठी उपलब्ध केल्या जातील असे श्री. कांबळे यांनी सांगितले.दिवाळी हंगामानिमित्त  पुणे, मुंबई, बोरिवली येथेही ज्यादा गाड्या सोडण्यात येत असून सुरक्षित प्रवासास प्राधान्य देणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करून एसटी च्या उत्पन्नवाढीसाठी प्रवाशांनी योगदान द्यावे,असे आवाहन स्थानक प्रमुख शाहरुख खान व सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ यांनी केले आहे.
Previous Post Next Post