मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे यांना जावलीत सुसज्ज क्रिडा संकुल व्हावे म्हणून लेखी निवेदन

केळघर :-  जावली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात जसा "जावली पॅटर्न " यशस्वी झाला त्यानंतर गेल्या काही वर्षात क्रिडा क्षेत्रातही तालुक्यातील मुला - मुलींनी गरूडझेप घेण्यास सुरुवात केली आहे परंतू तालुक्यात सुसज्ज क्रिडा संकुल नसल्याने त्यांच्या यशावर मर्यादा येत आहेत यासाठी मेढा दक्षिण विभागातील क्रिडाप्रेमी

कार्यकर्त्यांनी नुकतीच दरे येथे मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे यांना जावलीत सुसज्ज क्रिडा संकुल व्हावे म्हणून लेखी निवेदन दिले असता लगेच मा . मुख्यमंत्र्यांनी  मा .जिल्हाधिकारी जितेंद्र डुडि यांना या कामी लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या .   या लेखी निवेदनात " आम्ही जावली तालुक्याच्या वतीने आपणास मागणी करतो की ' जावली तालुक्यात सध्यस्थितीत क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या मुला- मुलींना खुप अडचणींना सामना करावा लागत आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या या तालुक्यात आजवर विविध क्षेत्रात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत . शुरवीरांच्या या तालुक्याने शिक्षण , अध्यात्म , शौर्य , सामाजिक , व क्रिडाक्षेत्रात अतुलनिय कार्य केले आहे . मात्र क्रिडा क्षेत्रात चमकदार कार्य करण्यासाठी मुला - मुलींना योग्य प्रशिक्षण व सुसज्ज क्रिडा संकुला अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच सरावासाठी व स्पर्धा घेण्यासाठी एक तर सातारा - महाबळेश्वर रोडचा वापर करावा लागतो नाही तर सातारा येथे पोलिस परेड ग्राऊंडला जावे लागते . जर या मुला मुलींना तालुका मुख्यालय अथवा आसपास प्रशस्त क्रिडा संकुल व प्रशिक्षक मिळाल्यास ते राज्य, राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवा आपली गुणवत्ता ' सिद्ध करू शकतील . मेढा येथे जागा उपलब्ध होत नसेल तर मेढा दक्षिण विभागात मौजे काळोली येथे शासकिय प्रशस्त जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून पाठपुरावा करुन सुसज्ज क्रिडा संकुल उभारावे अशी विनंती करण्यात आली आहे . मौजे काळोशी येथे क्रिडा संकुल उभारण्यासाठी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आले आहेत परंतू त्यांना यश आले नाही . आपण या प्रश्नी जातीने लक्ष घालुन आपल्या जन्मभूमीतील मुलांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे . यावेळी अंकुरा बाबा कदम , विठ्ठल पवार , विलास दुंदळे , संपत रवले , विश्वनाथ डिगे , बाळू शेठे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते .                           फोटो - जावली तालुका वेण्णा  दक्षिण विभागाचे वतीने दरे येथे मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदेंना निवेदन देताना शेजारी मा . जिल्हाधिकारी जितेंद्र डुडि , अंकुश बाबा कदम, विठ्ठल पवार, विलास दुंदळे आदी .
Previous Post Next Post