केळघर: जावळी तालुक्याच्या पश्चिम विभागातील केळघर परिसरात भात काढणीला सुरुवात
झाली असून यंदा भात पीक परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना पावसाने पाठ फिरवल्याने यावेळेस भातशेतीतून उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. केळघर परिसरात भात उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. भाताच्या पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. भाताचे पीक चे सर्वस्वी पावसावर आधारित आहे. यावर्षी सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडला होता . मात्र शेवटच्या काळात ज्या वेळेस भाताचे पीक परिपक्व होते. त्यावेळेस पावसाची आवश्यकता असते मात्र यावेळेस पावसाने पाठ फिरवल्यामुळे भात शेतीतून उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या परिसरात भाताची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांना काढणीसाठी व भात झोडणीसाठी पुरेसे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे शेतकरी पैरा पद्धतीने भात काढणी करत आहेत. सध्या शाळेला सुट्टी असल्याने भात काढणीसाठी व झोडणीसाठी शाळेतील विद्यार्थी हे देखील मदत करत आहेत. परिसरात हळव्या जातीच्या भाताची काढणी सुरू आहे.