केळघर : वार्ताहर - राज्य शासनाच्या व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार जावळी तालुक्यातील महसूल विभागात मराठा जातीच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत तालुक्यातील ४१ गावातील एक लाख ६५ हजार ७०४ नोंदी तपासण्यात आल्या असून त्यातून एक हजार ८९८ इतक्या कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहिती तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार कोळेकर यांनी सांगितले,महसूल विभागातील रेकॉर्ड विभागात कुणबी नोंदनी तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून जन्म मृत्यू नोंदणी व इतर अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे.हे सर्व अभिलेखे १९१२ पासून मराठीत आहेत.त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यापूर्वीची अभिलेखे मोडी लिपीत असल्याने यासाठी मोडी भाषेच्या जाणकारांची मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील १२५ गावापैकी ४१ गावातील कुणबी नोंदी तपासण्यात आल्या आहेत.४१ गावातील एक लाख ६५ हजार ७०४ नोंदी तपासण्यात आल्या. यापैकी एक हजार ८९८ मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सर्वाधिक नोंदी आखाडे गावात ३०७ नोंदी सापडल्या आहेत. उर्वरित गावांच्या नोंदी शोधण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू असून या कामी तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील मुनाळे, संजय बैलकर यांच्या सह एक अव्वल कारकून व आठ महसूल कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू असून लवकरच तालुक्यातील सर्व गावातील पडताळणी चे काम पूर्ण होईल. त्यानुसार अंतिम अहवाल सादर केला जाईल. हणमंत कोळेकर, तहसीलदार, जावळी
चौकट: आतापर्यंत मराठा कुणबी नोंदी तपासण्यात आलेली गावे पुढीप्रमाणे: मार्ली, शेते, आर्डे, इंदवली, बामणोली तर्फे कुडाळ, सर्जापुर, करंदी तर्फे कुडाळ, कुडाळ, भिवडी,सांगवी तर्फे कुडाळ, सोमर्डी, रानगेघर, हु मगाव, सोनगाव, रायगाव, म्हसवे, नरफदेव, दरे खुर्द, खर्शी तर्फे कुडाळ, सायगाव, दरे बुद्रुक, महिगाव, मोरघर, करंदोशी, मरडमुरे, आनेवाडी, बेलावडे, सायघर, आलेवाडी, कावडी, आखेगणी, विवर तर्फे कुडाळ, पिंपळी, काटवली, खर्शी बारामुरे, करहर, रुईघर, आखाडे, वालूथ, बेलोशी, महू
उर्वरित गावातील तपासणी सुरू आहे.
मेढा - मराठा कुणबी नोंदी तपासणी करताना तहसिलदार हणमंत कोळेकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी . राज्य शासनाच्या व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार जावळी तालुक्यातील महसूल विभागात मराठा जातीच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत तालुक्यातील ४१ गावातील एक लाख ६५ हजार ७०४ नोंदी तपासण्यात आल्या असून त्यातून एक हजार ८९८ इतक्या कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहिती तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार कोळेकर यांनी सांगितले,महसूल विभागातील रेकॉर्ड विभागात कुणबी नोंदनी तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून जन्म मृत्यू नोंदणी व इतर अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे.हे सर्व अभिलेखे १९१२ पासून मराठीत आहेत.त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यापूर्वीची अभिलेखे मोडी लिपीत असल्याने यासाठी मोडी भाषेच्या जाणकारांची मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील १२५ गावापैकी ४१ गावातील कुणबी नोंदी तपासण्यात आल्या आहेत.४१ गावातील एक लाख ६५ हजार ७०४ नोंदी तपासण्यात आल्या. यापैकी एक हजार ८९८ मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सर्वाधिक नोंदी आखाडे गावात ३०७ नोंदी सापडल्या आहेत. उर्वरित गावांच्या नोंदी शोधण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू असून या कामी तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील मुनाळे, संजय बैलकर यांच्या सह एक अव्वल कारकून व आठ महसूल कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
कोट: मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू असून लवकरच तालुक्यातील सर्व गावातील पडताळणी चे काम पूर्ण होईल. त्यानुसार अंतिम अहवाल सादर केला जाईल. हणमंत कोळेकर, तहसीलदार, जावळी
आतापर्यंत मराठा कुणबी नोंदी तपासण्यात आलेली गावे पुढीप्रमाणे: मार्ली, शेते, आर्डे, इंदवली, बामणोली तर्फे कुडाळ, सर्जापुर, करंदी तर्फे कुडाळ, कुडाळ, भिवडी,सांगवी तर्फे कुडाळ, सोमर्डी, रानगेघर, हु मगाव, सोनगाव, रायगाव, म्हसवे, नरफदेव, दरे खुर्द, खर्शी तर्फे कुडाळ, सायगाव, दरे बुद्रुक, महिगाव, मोरघर, करंदोशी, मरडमुरे, आनेवाडी, बेलावडे, सायघर, आलेवाडी, कावडी, आखेगणी, विवर तर्फे कुडाळ, पिंपळी, काटवली, खर्शी बारामुरे, करहर, रुईघर, आखाडे, वालूथ, बेलोशी, महू
उर्वरित गावातील तपासणी सुरू आहे.