महाराष्ट्र बंद च्या हाकेला साथ देत आज केळघर येथील बाजारपेठ बंद ठेवत मोर्चा काढण्यात आला .


          मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे - पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत तसेच सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला साथ देत आज केळघर येथील बाजारपेठ बंद ठेवत मोर्चा काढण्यात आला .
  केळघर :-  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलने , मोर्चा, साखळी उपोषण सुरु आहे . जावली तालुक्यातील मेढ्यासह प्रमुख गावा - गावात मोर्चा , नेत्यांना गावबंदीचे फलक लावत राज्य सरकारला जाग आणत मनोज जरांगे - पाटील यांना पाठींबा वाढत आहे . आज महाराष्ट्र बंदच्या हाकेला साथ देत केळघर बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत मोर्चा काढण्यात आला . यावेळी छञपती शिवाजी महाराज कि जय , जय भवानी जय शिवराय ,एक मराठा , लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काचं , नाही कुणाच्या बापाचं , जरांगे - पाटील आगे बढो , हम तुम्हारे साथ है । अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला .
        यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चास विविध पक्षांचे , सामाजिक संघटनांचे पदाधिकारी , कार्यकर्ते , मार्केट कमेटीचे पदाधिकारी , सदस्य तसेच सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले होते . यावेळी मेढा येथे चालू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले .
Previous Post Next Post