काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले व काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
सातारा:(सागर पाटील) : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या शिक्षण संस्थेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावलेमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला तसेच कार्यक्रमाची सुरवातीला श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावलेच्या गीतमंच म्हणजे मा श्री सुनील राजे सर व त्यांच्या विद्यार्थी - विद्यार्थींनी राज्यगीत , संस्थाप्रार्थना आणि स्वागत गीतांनी झाली यावेळी *माजी प्राचार्य सुहास साळुंखे, मा. प्राचार्य बी. बी. सावंत, कॅप्टन अमोल यादव, प्रा. बी. पी. इंगवले, प्रा. वसंतराव आर. सुुपुगडे, डॉ. टी. आर. पाटील, श्री. पोपटराव देशमुख, अँड. सुनिल पाटील, मा. प्राचार्य प्रो डॉ. सतीश घाटगे आदी मान्यवरांना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले. कॉलेजला माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनींची उज्वल, समृद्ध परंपरा लाभली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे होते. या समारंभासाठी मा. प्राचार्य सुहास साळुंखे, मा. अँड भरत पाटील ( नाना), प्रा. बी.पी. इंगवले,प्रा.वसंतराव सुुपुगडे, प्रा डॉ. टी. आर. पाटील,मा अँड.सुनिल पाटील, मा प्र.प्राचार्य एस. बी. पाटील, मा.प्राचार्य (प्रो) डॉ.सतीश घाटगे, मा आनंदराव सावंत (मुख्याध्यापक, श्री वा.वि.तळमावले), मा अँड. रावसाहेब खाडे, प्रा.सौ माणिक ढोले, प्रा.सौ सुमन कात्रे, प्रा.जे.वाय. मोरे,मा. सुरज यादव (सरपंच, तळमावले), मा अशोक माने (अजिव सेवक सदस्य,श्री स्वा.वि.शि.संस्था,कोल्हापूर),मा कृषीकन्या कुसुमताई करपे,मा अँड.राम होगले,
मा अँड दादासाहेब खाडे,
मा विकास पवार तसेच पत्रकार बंधू इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी बहुसंख्येने असलेली उपस्थिती आमचा आनंद द्विगुणित करणारी ठरली, अशी भावना मा. प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांनी व्यक्त केली. व पुढील महिन्यात महाविद्यालय 'नॅक ' कमिटीला सामोरे जात आहे. यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मा. राजाभाऊ माने ( अध्यक्ष, माजी विद्यार्थी मंडळ ), मा. प्रा अधिकराव कणसे ( सचिव, माजी विद्यार्थी मंडळ ) प्रा.डॉ विक्रांत सुपुगडे व कार्यकारीणी सदस्य व गुरुदेव कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाने ( माजी विद्यार्थी) आपली ओळख करून दिली व शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या तसेच त्यांच्या महाविद्यालयीन काळातील अनुभवकथन केले. असंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील महत्वाचा काळ काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावलेतील गुरुजनांच्या व सवंगड्यांच्या सानिध्यात घालवला. गुरुजनांचे स्थान आपल्या हृदयात ध्रुवताऱ्याप्रमाणे अटळ व अढळ आहे, अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली तसेच माजी विद्यार्थी पैकी प्रा विक्रांत सुपूगडे, प्रा संभाजी नाईक, प्रा लक्ष्मण दोडमणी या सर्वांनी Phd.पदवी प्राप्त व प्रा सुरेश यादव (SET Exam ) पास झाल्या बद्दल प्रमुख पाहुणे व मान्यवर मंडळी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले यावेळी *प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य सुहास साळुंखे म्हणाले, शिक्षकांच्या दृष्टीने विद्यार्थी ही खरी संपत्ती आहे. विद्यार्थी भेटल्यानंतरचा आनंद अवर्णनीय आहे. मातीशी घट्ट नाळ जोडून विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या दातृत्व गुणांमुळे आपण भारावलो, असे ते म्हणाले. महाविद्यालयाच्या विकासासाठी यावेळी *प्राचार्य सुहास साळुंखे यांनी २५००० रु. देणगीचा चेक मा. प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांचेकडे सुपूर्द केला. माजी विद्यार्थी मंडळाने सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत 'संगणक कक्ष ' व 'नॅक प्रोजेक्ट रूम ' चे काम हाती घेतले आहे, या कामासाठी प्रा. यु. आर. माने, प्रा. पी. डी. पाटील,3 श्री. शंकर मुगडे, मा. बापूसाहेब सावंत, श्री.वसंतराव हारुगडे (गुरुजी), श्री. आनंदराव कचरे, प्रा. सुमन कात्रे, सौ. कविता कचरे, श्री. निवास शामराव कचरे, मा. एल. जी. कदम, मा. अशोक बाबुराव सपकाळ आदी माजी विद्यार्थ्यांनी सढळ हस्ते देणगी जाहीर केली. मा. अँड भरत पाटील (नाना) यांनीही यावेळी सायन्स विभागासाठी सुसज्ज व अद्ययावत लॅबोरेटरीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर केले. माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वाचा अनुभव वेळोवेळी आला आहे. अत्यंत खेळीमेळीच्या , आनंदमय व उत्साहवर्धक वातावरणात स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. स्नेहभोजनाचा संपूर्ण खर्च श्री.आनंदराव साळुंखे यांनी केला. या समारंभासाठी मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे कार्याध्यक्ष, (श्री स्वा.वि. शि. संस्था, कोल्हापूर) मा. प्राचार्या शुभांगीताई गावडे सचिव, (श्री. स्वा. वि. शि. संस्था, कोल्हापूर), मा. कौस्तुभ गावडे, मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, मा. एस. के. कुंभार, मा. आर. के. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.