खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील कोयना विभागातील 6 गावात विविध बीएसएनएल टॉवरचा भूमिपूजन संपन्न


सातारा: (सागर पाटील)   पाटण तालुक्यात खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील कोयना विभागा मध्ये आरळ (अवसरी), नवजा, वन कुसवडे, गावडेवाडी, चाफेल, कारवठ, या एकूण 6 गावात एका टॉवरला 85 लाख रुपये एवढा निधी असा एकूण 6 बीएसएनएल टॉवरचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी रघुनाथ जाधव म्हणाले, सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा, पुरोगामी विचारांचा आहे. हाच विचार खा. श्रीनिवास पाटील साहेब पुढे घेऊन जात असताना जिल्हाभर विविध विकासकामे साकारत आहेत
खा.पाटील यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि अनुभवाच्या जोरावर जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडलात कोट्यावधींची विकासकामे होत आहेत. जिल्ह्यातील महामार्गावरील कामे, नळपाणी पुरवठा योजना, रस्ते यांसारखी मोठमोठी विकास कामे होत असताना गावा- गावात देखील अंतर्गत कामे होताना दिसून येत आहे. सातारा जिल्हा प्रचंड मोठा, ग्रामीण असला तरी असंख्य कामे
     या प्र स गी बीएसएनएलच्या टेलिफोन सल्लागार समितीचे सदस्य व पंचायत समितीचे माजी उपसभापती रघुनाथराव जाधव, बीएसएनएलचे माळी, खटावकर, उपअभियंता माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ शेलार, दिशा कमिटी सदस्य राजाभाऊ काळे, व इतर अन्य मान्यवर व 6 गावातील सरपंच , उपसरपंच, सदस्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post