सातारा : किल्ले प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीसंदर्भात स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य व शूरवीर जिवाजी महाले उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी निवेदन स्वीकारल्यानंतर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून किल्ले प्रतापगड येथील जिवाजी महाले स्मारकासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी लवकरच मुंबई येथील मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्या बैठकीस स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य तसेच शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती, किल्ले प्रतापगड समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले. स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक राज्याध्यक्ष तथा शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती, किल्ले प्रतापगड समितीचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव गायकवाड, सातारा जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले, राज्य उपाध्यक्ष प्रदीप काशीद, राज्य खजिनदार शिवाजी खामकर, राज्य संपर्कप्रमुख विजय काशीद, राज्य संघटक सुनील जाधव, राज्य प्रसिद्धी प्रमुख नारायण यादव, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रशांत जाधव, जिल्हा सरचिटणीस अमोल काशीद, समिती सदस्य पांडुरंग चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख केशव कदम, सातारा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पवार, सातारा तालुका सरचिटणीस नितीन पवार, सातारा तालुका उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी, सातारा तालुका खजिनदार संकेत निकम, कराड उत्तर तालुका उपाध्यक्ष नितीन काशीद, कराड उत्तर तालुका प्रवक्ते दत्तात्रेय गायकवाड, उंब्रज शहराध्यक्ष तानाजी भांदिर्गे यांच्यासह स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य व शूरवीर जिवाजी महाले उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.