आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम

केळघर : 
दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर तर्फ मेढा (ता. जावली) येथे उभारलेल्या प्रतिपंढरपूर क्षेत्र विठ्ठलधाममध्ये या वर्षापासून आषाढी एकादशीला बुधवार  दि.१७ रोजी वारी सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त या दिवशी येथे श्री विठ्ठलाची पहाटेची महापूजा, भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम दणक्यात साजरे होणार आहेत.      
या सोहळ्याचा जिल्ह्यातील भक्तांनी आनंद घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठलधामचे प्रमुख हभप प्रवीण महाराज शेलार यांनी केले आहे. जावली तालुक्यातील भक्तांना श्री विठ्ठलाच्या दर्शनाची सोय आपल्या भागातच उपलब्ध व्हावी, याकरिता आंबेघर येथे प्रतिपंढरपूर विठ्ठलधामची उभारणी करण्यात आली आहे. त्याचा उदघाटन एप्रिल २०२३ ला झाला.तेव्हापासुन प्रत्येक महिन्याच्या एकादशीला हज़ारो भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. येनार्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवार  दि.१७ रोजी विठ्ठलधाममध्ये पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल रुक्मिणीची महापूजा नामदार महेश शिंदे साहेब,श्री उमेशचंद्र दंडगव्हाळ-महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र,श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब-संचालक जिल्हाबैंक.
यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर काकड आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन इ. कार्यक्रम होणार आहेत.
         जावलीतील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या काळात शेतातील कामांमुळे इच्छा असतानाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही. भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन आपल्या भागातच व्हावे म्हणून स्थापन केलेल्या विठ्ठलधाममध्ये वारी सोहळ्याबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे..
Previous Post Next Post