आमदार छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मध्यस्तीला यश
केळघर :- जावली तालुक्यातील केळघर - मेढा विभागातील बोंडारवाडी धरणाच्या ट्रायल पिटच्या कामाला सातारा जावळीची लोकप्रिय आमदार छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मध्यस्तीला यश येऊन बोंडारवाडी धरणाच्या सर्व्हेला हिरवा कंदील मिळाला .
याबाबतची संबधित खात्याचे अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक नुकतीच आ . भोसले यांच्या पुढाकाराने बोंडारवाडी येथे पार पडली . यावेळी 54 गावांच्या पिण्याच्या पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटावा याकरता आ . भोसले यांच्या प्रयत्नातून एक टीएमसी धरणाला मान्यता मिळाली असून सदर धरणाचे सर्व्हे करण्यासाठी 80 लाख रुपये मंजूर असून सर्व्हेची टेंडर प्रक्रिया पूर्ण होवून वर्कऑर्डर झालेली आहे.
मात्र विविध मागण्यांसाठी सर्व्हे करण्यास बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध होता या वर तोडगा काढण्यासाठी आ . भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बोंडारवाडी येथे स्थानिक ग्रामस्थ ,जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब,जावळीचे प्रांत अधिकारी दादासाहेब दराडे ,तहसीलदार हणमंत कोळेकर , जलसंपदा विभाग तसेच पुनर्वसन व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मीटिंग झाली या मध्ये महाराज साहेब यांचे शब्दावर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी सर्व्हे करण्यास मान्यता दिली यावेळी कमीत कमी जमीन बाधित होईल आणि एक टीएमसी चे धरण होईल असा सर्व्हे करणेचे सूचना अधिकारी यांना केलेत. महाराज साहेब यांनी शेवट पर्यंत बोंडारवाडी ग्रामस्थ यांचे सोबत असून सर्व्हे झालेनंतर योग्य ती जागा ठरवून ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही याची पुर्णपने काळजी घेतली जाईल प्रसंगी निधी वाढवून घेतला जाईल. असे ग्रामस्थ यांना आश्वासित केले . तेव्हा ग्रामस्थांनी सर्व्हे कराण्यास मान्यता दिली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व ज्ञानदेव रांजणे साहेब यांनी ग्रामस्थांचे आभार मानले .