शहीद तुकाराम ओबळे स्मारकाला निधी मिळण्याकरीता : पत्रकार संघ जावळीचे धरणे आंदोलन : जावली तालुक्यातील केडंबे गावचे सुपुत्र शहीद तुकाराम ओबंळे यांच्या जन्मगावी उभारण्यात येणा -या स्मारकाला .अद्याप राज्यसरकारकडुन निधी उपलब्ध झाला नसल्याने जावली पत्रकार संघ १५ ॲागस्टला मेढ्यात धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन पत्रकार संघ जावळी चे अध्यक्ष वसीम शेख कार्याध्यक्ष सादिक सय्यद सचिव विनोद वेंधे उपाध्यक्ष संतोष बेलोशे यांचेकडुन जावली तहसिलदार यांना देण्यात आले आहे . पत्रकार संघ जावळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेल्या राष्ट्राचा स्वतंत्रता दिवस १५ ऑगस्ट आपण साजरा करीत आहोत. हि फार आनंदाची गोष्ट आहे. मात्र जावली तालुक्यातील केडंबे या गावचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांनी आपल्या बलिदानातुन राष्ट्राला सर्वोच्च बलिदान देत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर नामोहरम करत जगासमोर पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र असल्याचा बुरखा फाडला. याच जावलीच्या भुमीपुत्राचा मरणोत्तर भव्य अण दिव्य स्मारक उभारण्याचा मनोदय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०१३ मध्ये मंत्रालयीन बैठकीत सुचना देत स्मारक उभारण्याच्या बाबतीतच्या सर्व प्रशासकीय बाबी पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र स्मारकाच्या जागेचा प्रश्न गेली १० वर्षे रखडत पडला होता. मात्र तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला तब्बल १० वर्षे लागली ही बाब खेदजनक आहे. शहिद तुकाराम ओंबळे स्मारक त्यांच्या केडंबे या जन्म गावी उभारण्याकरीता राज्याच्या सरकारकडुन लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन स्मारकाचा गत १० वर्षापासुन रखडत पडलेला प्रश्न आपण मार्गी लावावा अशी मागणी पत्रकार संघ जावळी या निवेदनातर्फे करीत आहे. स्वतंत्र भारताचा स्वतंत्र दिन साजरा करीत असताना जावली तालुक्याच्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानाला व्यर्थ न घालवता महाराष्ट्र राज्य सरकारने लवकरात लवकर निधीची उपलब्धता करावी याकरीता १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी आम्ही पत्रकार संघ जावळी तालुक्याच्या सुपुत्रासाठी धरणे आंदोलनास बसत आहोत.. लोकशाहीत आपण आमच्या मागण्यांचा सार्वभौम विचार करुन अशोकचक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळेंच्या जन्म गावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या निधीचा प्रश्न आपण मार्गी लावावा ही आपणास नम्र विनंती.( जावली तहसिलदार यांना निवेदन देताना अध्यक्ष वसीम शेख , कार्याध्यक्ष सादिक सय्यद , सचिव विनोद वेंदे उपाध्यक्ष संतोष बेलोशे )

Previous Post Next Post