महसूल विभाग जावली यांच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वाहन चालक ज्ञानेश्वर बेलोशे यांचा 1ऑगस्ट 2023हा महसूल दिनअसून या दिवशी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.आज जावळी येथे तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या हस्ते उत्कृष्ठ महसूल कर्मचारी म्हणून श्री ज्ञानेश्वर बेलोशे यांना महसूल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरविण्यात आले. यापूर्वी २०१५ मध्येही त्यांना चांगल्या सेवेबद्दल बेलोशे यांना गौरविण्यात आले होते.ज्ञानेश्वर बेलोशे यांचे मूळ गाव केळघर,ता.जावळी असून महसूल विभागामध्ये २००८ ला ते नोकरीला लागले.सध्या ते जावळीच्या तहसीलदार यांच्या गाडीवर वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत.सन २०२२ -२०२३ या महसुली वर्षात त्यांनी उल्लेखनीय काम केले.एवढेच नव्हे तर गेल्या पंधरा वर्षांत विनाअपघात गाडी चालवून त्यांनी महसूल अधिकाऱ्यांची सुरक्षितता जपली,या त्यांच्या कामाचीही प्रशासनाने दखल घेत महसूल दिनानिमित्त उत्कृष्ठ कर्मचारी महसूल म्हणून त्यांना जावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.महसूल विभागाकडून प्रमाणपत्र,शाल व श्रीफळ देऊन उत्कृष्ष्ठ कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा,तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा,यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच १ ते ७ ऑगस्ट,२०२३ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यावेळी प्रांताधिकारी दादासो खराडे,नायब तहसीलदार शोभा भालेकर,नायब तहसीलदार संजय बैलकर आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post