केळघर : जावली तालुक्यातील सातारा - महाबळेश्वर मुख्य रोड वर अस नीतळ जवळील असणारा 100 वर्षे जुना वेण्णा नदीवरील रामजी बुवा पुलाच्या दोन्ही साईट च्या कडा तुटल्या असून पुलाच्या दोन्ही साईट ला खोल दरी तयार झाली आहे या ठिकाणी बऱ्याच वेळा वाह
नां चे अपघात झाले असून अनेकांना आपला प्राण गमवा लागला आहे पुलाच्या साईटचा भाग शिकस्त झाला आहे येथे एस कॉर्नर रस्ता असून रस्त्याच्या दुतर्फा उंच च्या उंच गवत उगवल्यामुळे वाहन चालकांना या दरीचा अंदाजही करता येणार नाही त्यातच महाबळेश्वरला फिरायला येणार्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमात वाढत असून
या पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षा पोल देखील नसून महाबळेश्वर हुन सातार्याकडे जाताता कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे वाहन चालकांना या तुटलेल्या भागा बददल महिती नसते परीणामी भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही येथे एखादा मोठा अपघात झाल्यावर च सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा सवाल वाहन चालकांकडुन होत आहे तरी याची लवकरात लवकर दखल घेऊन या पुलाच्या दोन्ही बाजू चे दुरुस्ती चे काम करावे तो पर्यंत किमान पुलाच्या दोन्ही साईटला सुरक्षा पोल व सुरक्षा फलक लावण्यात यावे अशी मागणी होत आहे